राजे गटाचे निष्ठावंत चंद्रशेखर हेंद्रे यांचे निधन


फलटण येथील राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे अल्पशा आजाराने निधन. आज सकाळी ९ वाजता अंत्ययात्रा.

स्थैर्य, फलटण, दि. २० फेब्रुवारी : फलटण शहरातील राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत असून राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील त्यांच्या निवासस्थानापासून आज सकाळी ०९ वाजता अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

हेंद्रे हे राजकीय क्षेत्रात सक्रिय राहून राजे गटाशी निष्ठा राखणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.


Back to top button
Don`t copy text!