
दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२२ । फलटण । फलटण पंचायत समिती मधील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत मिसाळ यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी तरुणांना लाजवेल अशा प्रकारे पंढरपूर ते कन्याकुमारी हा १५०० कि. मी. प्रवास सायकलने १२ दिवसात यशस्वीपणे पूर्ण केला असून या कामगिरीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
सातारा जिल्हा एकल प्रा. शिक्षक सेवा मंचाचे वतीने मार्गदर्शक व गुरुवर्य चंद्रकांत मिसाळ यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस महाराष्ट्र राज्य एकल प्रा. शिक्षक सेवा मंच, शाखा सातारा जिल्हा व एकल मंच कार्यकारिणीच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या असल्याचे जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ. मनीषा महाडिक यांनी सांगितले.