चंद्रकांत औंधे यांचे निधन


स्थैर्य, औंध, दि.१६: म्हासुर्णे ता.खटाव येथील लिंगायत समाजातील प्रसिद्ध किराणा व भुसार मालाचे व्यापारी चंद्रकांत शरद औंधे ऊर्फ आप्पा  वय 54 यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले.
म्हासुर्णे,चितळी, पुसेसावळी,निमसोड  पंचक्रोशीत त्यांनी  आपल्या व्यवसायात मोठा जम बसविला होता. व्यापारी क्षेत्रात अतिशय धाडसी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा नावलौकिक होता. व्यापाराबरोबरच गरजू लोकांना मदत करीत असत.  म्हासुर्णे येथील सामाजिक कार्यात ही ते सहभागी होत असत. पुसेसावळी, म्हासुर्णे परिसरात ते आप्पा यानावाने परिचित होते. विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांशी त्यांचे जिव्हाळयाचे संबंध होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी,भाऊ ,बहिणी असा परिवार आहे.

Back to top button
Don`t copy text!