मतदार जागृती उत्कृष्ठ कार्याबद्दल चंदन कर्वे सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, फलटण दि.25 : 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त सातारा येथे आयोजित कार्यक्रमात; भारतीय निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणार्‍या मतदार जागृती कार्यक्रमामध्ये फलटण मतदार संघात उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूलमधील वरिष्ठ शिक्षक चंदन कर्वे यांना अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, उपजिल्हाधिकारी श्रीमती नीता शिंदे, सातारा विधानसभा मतदारसंघाचे मतदान नोंदणी अधिकारी मिनाज मुल्ला आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Back to top button
Don`t copy text!