सातारा जिल्ह्यात २५ व २६ नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पिकांची तसेच जनावरांची काळजी घेण्याचा सल्ला


दैनिक स्थैर्य | दि. २४ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
सातारा जिल्ह्यामध्ये दि. २५ व २६ नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व ताशी ३० ते ४० कि.मी. इतया वेगाच्या वार्‍यासह हलया ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा इशारा ग्रामीण कृषी मौसम सेवा, कोल्हापूर या संस्थेने दिला आहे.

पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्याने सध्या काढणीस आलेल्या भात, नाचणी व इतर पिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा संस्थेने दिला आहे.

संस्थेने भात पिकाबाबत काळजी घेण्याची सूचना करताना म्हटले आहे की, भात पीक सध्या पक्व झाले असून ते भिजल्यास दाणे खराब होऊ शकतात. त्यामुळे काढलेले भात पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे. तसेच नाचणीही पव झाली असून तीही भिजल्यास खराब होऊ शकते, म्हणून काढलेली नाचणी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला संस्थेने दिला आहे.

इतर पिकांमध्ये गहू पीक पेरणी झाली असून त्याची मुकूटमुळे फुटण्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे गहू पिकामध्ये पाणी साठून राहिल्यास मूळ कूज होऊन झाडांची वाढ खुंटू शकते. त्यामुळे गहू पिकामध्ये पाणी साठू नये म्हणून चर काढून देऊन पाण्याचा निचरा करावा.

हरभरा पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून हरभरा पिकामध्ये पावसाचे पाणी साठू नये म्हणून चर काढून देऊन पाण्याचा निचरा करावा.

टोमॅटो व केळी पिकासाठी वेगाची वार्‍याची शयता असल्याने झाडे उन्मळून पडू नयेत म्हणून झाडांना काठ्यांच्या/बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा.

विजांच्या कडकडाटासह पावसाची शयता असल्याने जनावरे शयतो लांब माळरानावर चारावयास नेऊ नयेत, असे संस्थेने म्हटले आहे. तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत व जनावरांना पावसाचे वाहून येणारे पाणी पिण्यास देऊ नये.

कुकुटपालन करणार्‍यांनी पक्ष्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. पोल्ट्री पक्षी पया शेडमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवावेत.

शेतकर्‍यांसाठी सामान्य सल्ला देताना संस्थेने म्हटले आहे की, शेतकर्‍यांनी हवामान आधारित शेतीविषयक सल्ला आपल्या मोबाईलवर मिळविण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून ‘मेघदूत’ अ‍ॅप डाऊनलोड करावे व त्याचा वापर करावा. इशारा कालावधीत शेतकर्‍यांनी खत देणे किंवा फवारणी करणे टाळावे.

शेतकर्‍यांनी स्वत:ची व आपल्या पशूधनाची काळजी घ्यावी, असा सल्ला ग्रामीण कृषी मौसम सेवा संस्थेने दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!