स्थैर्य, दि.१४: भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान देशात वेगवेगळ्या भागांत पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागानुसार उत्तरेकडील हिमालयी भागात वेस्टर्न डिस्टर्बेस ऍक्टिव्ह झाल्याने देशातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या मैदानी भागात उणे तापमानात थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये हवामान खात्यानुसार 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी सकाळी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तराखंड येथील काही भागांत बर्षवृष्टीही होणार आहे.
हवामान खात्यानुसार पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीतही 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी पावसाचे ढग असणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्येही काही भागांत आणि समुद्री किनारी भागांत 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे.
त्याचबरोबर अंदमान आणि निकोबार, अरुणाचल प्रदेशाच्या काही भागांत 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे.