दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२३ । बारामती ।
बारामती येथील चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी विक्रम अजिंक्य राजे नींबाळकर यांनी वैदकीय क्षेत्रातील नीट परिक्षे मध्ये जीवशास्त्र व भौतिकशास्त्र परीक्षेत 180 पैकी 180 गुण मिळवत भिमपराक्रम केला आहे बारामतीतील प्रतिथयश वैद्यकीय तज्ञ डॉ.अजिंक्यराजे निंबाळकर यांच्या मुलाने विक्रम राजेनिंबाळकरने देशात 72 वी तर खुल्या गटात 56 वी रँक पटकावली.बारामतीतील.अजिंक्यराजे निंबाळकर व डॉ. प्राची राजेनिंबाळकर यांचा विक्रम हा मुलगा असुन नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत विक्रमने भौतिक व जीवशास्त्रात नेत्रदिपक कामगिरी केली आहे.विक्रमने जीवशास्त्र व भौतिकशास्त्र परीक्षेत 180 पैकी 180 गुण मिळवले, तर 720 पैकी 710 मार्क मिळवत महाराष्ट्रात बारामतीचे नाव कोरले.विक्रमने दहावीपर्यंतचे शिक्षण विद्या प्रतिष्ठानच्या सीबीएसई स्कुलमधुन तर 11वी नंतरचे शिक्षण चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, सावळ (बारामती) येथे पूर्ण केले.बारामतीच्या इतिहासात सर्वाधिक गुण मिळवण्याचा भिमपराक्रम त्याने केला असुन भारतातील कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात त्याला प्रवेश मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चैतन्य इंटरनॅशनल स्कूलचे सर्व शिक्षक यांनी दिलेले मार्गदर्शन व घेतलेले कष्ट या मुळे मला सहज यश मिळाले असल्याचे विक्रम यांनी सांगितले.