दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । सातारा । जिल्ह्यात वारंवार लॉकडाउन वाढत असल्याने व्यापारी, व्यवसायिक व लहान लहान हातगाडे फेरीवाल्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तीन-तीन महिने व्यवहार ठप्प असतील तर माणसानं कसं जगायचं. याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने तात्काळ लॉकडाउन मागे घेवून व्यवसायिकांना दिलासा द्यावा अन्यथा वीज बिल, पाणी पट्टी व सरकारी देणी शासनाने पुर्णतः माफ करावीत, अशी विनंती कर्तव्य सोशल ग्र्ाुपच्या अध्यक्षा श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांची पाच गटात विभागणी करून ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे त्या त्या गटातील आस्थापना सुरू करण्यास मान्यता दिल्याने सर्व आस्थापना सुरू करण्यास स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली आहे. आस्थापना सुरू झाल्याने आर्थिक उलाढाल सुरू होवून सर्व क्षेत्रांना विशेषतः लहानमोठया व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र सातारा जिल्हयातील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्वच व्यापायांची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे सातारा शहरातील व्यापारी वर्गात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने सातारा जिल्हा महासंघाच्यावतीने आज दि. 6 जुलै रोजी सकाळी साखळी मुक आंदोलन करण्यात आले. व्यापारी महासंघाने पुकारलेल्या या आंदोलनात श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले सहभागी झाल्या होत्या. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, हिदुस्थानात मार्च 2020 पासून लॉकडाउनला सुरूवात झाली. शासनाने वेळोवेळी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा आदेश सातारा जिल्हयातील तमाम व्यवसायिकांनी पाळला. लॉकडाउनच्या झळाी सोसल्या. मात्र आता सारेच हतबल झाले आहेत. मानसिक परिस्थिती बिघडल्याने लॉकडाउनला कंटाळून काहींनी आत्महत्या केल्या. तीन-तीन महिने व्यवहार ठप्प असतील तर माणसानं जगायचं कसं असा सवाल उपस्थित करून जिल्हा प्रशासनाने नियमावली तयार करावी? वेळा ठरवून द्याव्यात. मात्र छोटे छोटे व्यावसायीक व व्यापारी यांच्यावरील अन्याकारक लॉकडाउन तात्काळ उठवावा असे आवाहन सौ.वेदांतिकाराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला केले आहे. दरम्यान, सातारा प्रमाणेच पुणे जिल्हाही टप्पा 4 मध्ये आहे.मात्र तेथील प्रशासनाने पुणे शहर त्यातून वेगळे केल्याने तेथील सर्वच आस्थापनांना सायंकाळी 7 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे. पुण्याप्रमाणेच सातारा शहराला वेगळे करून व निकष लावून सातारा शहरातील आस्थापनांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शहरातील सर्व व्यापारी संघटना व सातारा जिल्हा व्यापारी महासंघाने निवेदनाव्दारे केली आहे.