प्रांताधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर चौधरवाडीतील शेतकर्‍यांचे साखळी उपोषण स्थगित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
फलटण-आळंदी पंढरपूर या नव्याने तयार होणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर फलटण तालुक्यातील चौधरवाडी हे गाव लागते. या गावातील होळकर वस्ती सर्वे नं ३६ व ३६ ब ला सर्वीस रोड मिळावा यासाठी ३० ऑक्टोबर २०२३ पासून होळकर वस्ती येथील शेतकरी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसले होते. सलग १२ दिवस या ठिकाणी उपोषण चालू होते. या ठिकाणी प्रांताधिकार्‍यांनी भेट देऊन पर्यायी मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हेे साखळी उपोषण आज स्थगित करण्यात आले आहे. मात्र, ३ डिसेंबर २०२३ पर्यंत यावर योग्य निर्णय न झाल्यास शेतकरी पुन्हा साखळी उपोषणाला असे, त्यांनी निवेदनाद्वारे प्रांताधिकार्‍यांना सांगितले आहे.

१२ दिवस चाललेल्या शेतकर्‍यांच्या साखळी उपोषणात भगवान होळकर, नवनाथ करचे, युसुफ शेख, बापू होळकर, बाळू खांडेकर, महादेव होळकर, प्रदिप होळकर, मोनाली होळकर, शोभा होळकर, अर्चना होळकर, किरण होळकर, राखी होळकर, शोभा होळकर, सुरेखा भोसले, अक्षय करचे, छबुबाई करचे, संतोष होळकर, मंगेश होळकर यासोबत अ‍ॅड. कांचनकन्होजा खरात याही सहभागी होत्या.


Back to top button
Don`t copy text!