चढ्या भावाने खतांची व बियाण्याची विक्री करणाऱ्या दुकानावराती छापे घालून त्यांच्या वरती कार्यवाही करावी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : राज्यात विविध ठिकाणी चढ्या भावाने बी-बियाणे व खते यांची मोठ्या प्रमाणावराती विक्री चालू आहे. सध्या हे सुरू असलेले लॉकडाऊन व त्यामुळे शेतीत झालेले नुकसान आणि आता त्या मधेच ह्या खतांची व बी बियाणांची जास्त भाव आकरल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या तक्रारी नुसार कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष महेश कडुस यांनी महाराष्ट्रामधील तमाम संघटनेच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र सचिव प्रकाश यादव, सातारा अध्यक्ष नितीन निंबाळकर यांनी ह्या विषयास हाथ घातला. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका तहसीलदार यांना आपल्या कृषी पदवीधर संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले. त्यात तहसीलदार यांनी स्वतः तालुका स्तरावरती एक वेगळी समिती नेमून अश्या चढ्या भावाने खतांची व बियाण्याची विक्री करणाऱ्या दुकानावराती छापे घालून त्यांच्या वरती कार्यवाही करावी, अशी मुख्य मागणी केली आहे. ह्या विषयावरती आपण नक्की लक्ष केंद्रित करून नक्की ह्या समस्या सोडवू असे आश्वासन ही प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील यांनी दिले आहे.

या वेळी फलटण तालुका तालुकाध्यक्ष ओंकार गोडसे, कार्याध्यक्ष सूरज जाधव, प्रतीक मसुगडे, शहराध्यक्ष अनिकेत पिसाळ, उपाध्यक्ष वरद कापसे, हर्षद फडतरे, प्रशांत शिर्टोडे, सचिव वैभव फडतरे, अनिकेत काकडे, अंकुश गटकुल, समीर नाळे तसेच विद्यार्थी संघटक निखिल माळवे, सुयश शिंदे, चिराग चौधरी, कुणाल अब्दगीरे यांची प्रमुख उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!