दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । पुणे । येथील केन असोसिएटस् यांना मोस्ट इमर्जिंग अँड आऊट स्टँडींग आर्किटेक्चरल व इंटिरियर डिझाईन कन्सल्टन्सी फर्मसाठी म्हणून तर स्विकार मेहता यांना एक्सलन्स इन आर्किटेक्चरल व इंटिरियर डिझाईन कन्सल्टन्सीसाठी त्यासोबतच मृणाल पोरे यांना एक्सलन्स इन इंटिरियर डिझाईन कन्सल्टन्सीसाठी सन्मानित करण्यात आले आहे. दरम्यान, केन असोसिएटस्, स्विकार मेहता व मृणाल पोरे यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे फलटणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बंगळुरु येथील हॉटेल ताज वेस्ट एंड येथे झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी आर्किटेक्ट के. जयसिम, डॉ. अजय चंद्रम, बिगीन अप रिसर्च इंटेलेजन्स प्रा. लि.चे डॉ. आनंद नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
बिगीन अप रिसर्च इंटेलेजन्स प्रा. लि., बंगळुरु यांच्यातर्फे देण्यात येणारा मोस्ट इमर्जिंग अँड आऊट स्टँडींग आर्किटेक्चरल व इंटिरियर डिझाईन कन्सल्टन्सी फर्म ऑफ द इअर अवॉर्ड 2022 केन असोसिएटस् यांना प्रदान करण्यात आला आहे. बिगीन अप रिसर्च इंटेलेजन्स प्रा. लि., बंगळुरु यांच्यातर्फे देण्यात येणारा एक्सलन्स इन आर्किटेक्चरल व इंटिरियर डिझाईन कन्सल्टन्सी ऑफ द इअर अवॉर्ड 2022 स्विकार सुभाष मेहता यांना प्रदान करण्यात आला. बिगीन अप रिसर्च इंटेलेजन्स प्रा. लि., बंगळुरु यांच्यातर्फे देण्यात येणारा एक्सलन्स इन इंटिरियर डिझाईन कन्सल्टन्सी ऑफ द इअर अवॉर्ड 2022 मृणाल किरण पोरे यांना प्रदान करण्यात आला.
केन असोसिएटस्, स्विकार मेहता व मृणाल पोरे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
यानिमित्त महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, युवा नेते तेजसिंह भोसले, युवा नेते रणजितसिंह भोसले, फलटण बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष राजीव नाईक निंबाळकर, क्रेडाई फलटणचे अध्यक्ष जावेद तांबोळी, मोनिता ग्रुपचे प्रमोद निंबाळकर, क्रिती प्रॉपर्टीजचे राजकुमार मेहता, धिरेन शहा, अरिहंत ऑटोमोटिव्हचे मंगेश शेठ दोशी, ज्येष्ठ वास्तूविशारद महेंद्र जाधव फलटणचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.