
दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । सातारा । माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर 2022 रोजी शौर्य दिन साजरा करण्याचे राज्य शासनाने निश्चीत केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा यांच्या वतीने दि.29 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता महासैनिक भवन, करंजे नाका, सातारा येथे शौर्य दिन साजरा करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा यांनी शौर्यदिनासाठी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांनी केले आहे.