दैनिक स्थैर्य । दि. १८ मार्च २०२२ । मुंबई । जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने, सेंच्युरी मॅट्रेस या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या व तीन दशकांची परंपरा असलेल्या मॅट्रेस ब्रॅण्डने आपल्या स्लीप इट ऑफ या अभियानाची घोषणा केली आहे. झोपेतून मिळणाऱ्या सुटकेच्या माध्यमातून लोकांना चांगल्या झोपेचे महत्त्व जाणवून देण्याचे उद्दिष्ट या अभियानापुढे आहे. उद्योगक्षेत्रातील स्लीप स्पेशालिस्ट म्हणून आपले स्थान अधिक भक्कम करण्याचाही हेतू यामागे आहे. सेंच्युरी मॅट्रेसने प्रख्यात क्रीडापटू आणि आपली ब्रॅण्ड अँबॅसडर सानिया मिर्झा हिच्यावर कार्यक्रमाचा शुभारंभ करण्याची जबाबदारी दिली आहे.
अत्यंत वेगवान आयुष्य जगणाऱ्या व त्यामुळे थकून जाणाऱ्या व्यक्तींसाठी स्लीप रिज्युव्हनेशन कार्यक्रम विकसित करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत, लोकांना ‘स्लीप इट ऑफ’ शिबिरासाठी आमंत्रित केले जाईल. यामध्ये झोप या विषयावरील तज्ज्ञ त्यांचे समुपदेशन करतील व झोपेद्वारे होणाऱ्या पुनरुज्जीवनाचा अनुभव घेण्यासाठी मदत करतील. प्रख्यात व लोकप्रिय योगतज्ज्ञ अनुष्का यांना नामांकित/आमंत्रित करून सानिया मिर्झा कार्यक्रमाचा शुभारंभ करेल. या कार्यक्रमात झोपेच्या स्वाधीन होण्याच्या मजेशीर व प्रांजळ पद्धतींचा अनुभव घेऊन लोकांना चांगल्या झोपेचे महत्त्व स्वत:हून जाणवावे यासाठी प्रयत्न केले जातील. कार्यक्रमात सहभागी झालेले दुसऱ्या दिवशी आपले अनुभव सर्वांपुढे मांडतील आणि असाच कामाचा ताण असलेले व त्यामुळे शारीरिक व मानसिक थकव्याचा सामना करणाऱ्या त्यांच्या संपर्कातील व्यक्तीला पुढील अनुभवासाठी नामांकित करतील.
काम व आयुष्य यांच्यात समतोल राखताना लोकांना झगडावे लागत असताना, या अभियानाला सेंच्युरी मॅट्रेसच्या अनेकविध उत्पादनांच्या श्रेणीसह चांगल्या झोपेच्या सवयीचे महत्त्व प्रकाशात आणायचे आहे तसेच चांगल्या आरोग्यासाठी झोप कशी महत्त्वाची आहे याबद्दल माहिती द्यायची आहे.
सेंच्युरी मॅट्रेसचे कार्यकारी संचालक उत्तम मालानी या उपक्रमाबद्दल म्हणाले, “गेल्या ३० वर्षांपासून आम्ही लोकांचे आरोग्य व आराम यांना प्राधान्य देण्यासाठी वचनबद्ध आहोत. चांगल्या झोपेचे महत्त्व माहीत असूनही आपण आपल्या व्यग्र कामाच्या वेळापत्रकामुळे किंवा चुकीच्या गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे, झोपेविषयीच्या सवयींना प्राधान्य देत नाही. स्लीप इट ऑफ या आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून, या जागतिक निद्रादिनी, आम्हाला लोकांना असे आवाहन करायचे आहे की, झोप न येण्यासारख्या समस्यांना सन्मानाने मिरवणे सोडून द्या. चांगल्या झोपेची शक्ती तुम्हाला नवीन जोम देऊ शकते, तुमच्या चित्तवृत्ती खुलवू शकते आणि औषधाचे काम करू शकते यावर, आमचा, सेंच्युरी मॅट्रेसचा, ठाम विश्वास आहे. लोक बऱ्याच काळापासून नेमक्या कशाला मुकत आहेत हे त्यांना या अभियानाच्या माध्यमातून अनुभवता येईल.”