स्थैर्य, फलटण, दि. १८: केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांनी फलटण तालुक्यातील 2 रस्त्यांच्या कामासाठी 9 कोटी 86 लाख 65 हजार रुपये मंजूर करण्यात आल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि आ. दीपकराव चव्हाण यांना दोन स्वतंत्र पत्राद्वारे कळविले आहे.
फलटण – कुरवली – मांडवखडक – दालवडी – उपळवे – वेळोशी – कुलकजाई या राज्य महामार्ग क्रमांक 67 पैकी सीतामाई घाट रस्त्याच्या कि. मी. 22-400 ते 22-600 या 4 कि. मी. रस्त्यासाठी 5 कोटी 92 लाख 65 हजार रुपये आणि फलटण – आसू – तावशी या जिल्हा सरहद्द राज्य महामार्ग क्रमांक 7 पैकी 28 कि. मी. अंतरातील कामासाठी 3 कोटी 94 लाख रुपये असे फलटण तालुक्यातील 2 रस्त्यांसाठी एकूण 9 कोटी 86 लाख 65 हजार रुपये मंजूर केल्याचे सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे.