दैनिक स्थैर्य । दि.०१ फेब्रुवारी २०२२ । सातारा । औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा मधील डिझेल मेकॅनिक व्यवसायासाठी गजानन ऑटोमोटीव्ह प्रा.लि. सातारा मार्फत दुहेरी प्रशिक्षण प्रणालीला (D.S.T.-Duel System of Training) सुरु करण्यासाठी प्रशिक्षण महानिदेशालय केंद्र शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे, अशी माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथील मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार एम.के. उपाध्यये यांनी दिली आहे.
हा उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सातारा येथे सुरु होत आहे. 13 जानेवारी 2022 रोजी संस्थेचे प्राचार्य सचिन धुमाळ, उपप्राचार्य संजय मांगलेकर, सहायक प्रशिक्षणार्थी मिलिंद उपाध्ये व पी. वाय. बगाडे यांनी दुहेरी प्रशिक्षण प्रणालीचे मंजूर आदेश दुहेरी प्रशिक्षण प्रणालीचे संचालक सचिन शेळके व प्रवीण शेळके यांना सुपूर्द केले. जानेवारी पासून डिझेल मेकॅनिकच्या दोन तुकड्यांमध्ये 48 विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे.