केंद्र सरकारकडून खरीप पिकांचे हमीभाव जाहीर; पण अंमलबजावणीचे काय? – अनिल कदम

सोयाबीनला ५,३२८, कापसाला ८,११० रुपयांपर्यंतचा दर; हमीभावाने खरेदीची सक्ती करण्याची मागणी


स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑगस्ट : केंद्र सरकारने २०२५-२६ च्या खरीप हंगामासाठी सोयाबीन, कापूस, तूर आणि भातासह १४ प्रमुख पिकांच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) जाहीर केल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य मोबदला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी दिली.

या नव्या घोषणेनुसार, सोयाबीनचा हमीभाव ४३६ रुपयांनी वाढून आता ५,३२८ रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. लांब धाग्याच्या कापसाला ८,११० रुपये, तर तुरीला ८,००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळणार आहे. मक्याच्या दरात १७५ रुपयांची वाढ होऊन तो २,४०० रुपये झाला आहे.

हमीभाव जाहीर झाले असले तरी, वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारात हमीभावाप्रमाणे दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, असे अनिलकुमार कदम यांनी म्हटले आहे. त्यामुळे, सरकारने सर्व व्यापाऱ्यांना आणि खरेदीदारांना हमीभावानेच माल खरेदी करण्याची सक्ती करावी, अन्यथा ही घोषणा केवळ कागदावरच राहील, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Back to top button
Don`t copy text!