राज्यातील मत्स्य व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी केंद्राची सकारात्मक भूमिका – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२२ । नवी दिल्ली । राज्यातील मत्स्य व्यवसायातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राची सकारात्मक भूमिका आहे, अशी माहिती आज विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी दिली.

केंद्रीय मत्स्य, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांची विधानसभा अध्यक्ष ॲड.  नार्वेकर यांनी भेट घेतली. या भेटीत राज्यातील मत्स्य व्यवसायात येणाऱ्या समस्या मांडल्या. यावर केंद्र शासनाकडून याविषयी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री श्री. रूपाला यांनी दिले असल्याचे  ॲड. नार्वेकर यांनी बैठकीनंतर सांगितले.

समुद्रामध्ये विशिष्ट आर्थिक क्षेत्र (exclusive economic zone) अंतर्गत म्हणजे 12 नॉटिकल मैल सीमेच्या बाहेर येणाऱ्या अडचणींबद्दल मच्छीमारांच्या काही मागण्या होत्या. त्यावर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असल्याचे ॲड. नार्वेकर यांनी सांगितले.

या बैठकीस मच्छिमारांचे शिष्टमंडळही उपस्थित होते. मच्छिमारांना येत असणाऱ्या समस्या त्यांनीही मांडल्या. यावर केंद्रीय मंत्री यांनी सांगितले, लवकरच या विषयावर उपाययोजना सुचवून त्याची अंमलबजावणी केली जाईल. ॲड.  नार्वेकर यांनी मच्छीमांराचा विषय  केंद्रीय ‍ मत्स्यपालन सचिव जे.एन. स्वेन यांच्यासोबत चर्चा केली.


Back to top button
Don`t copy text!