दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२४ | फलटण |
मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा याशिनी नागराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय फलटण डॉ. अंशुमन धुमाळ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री. विजय गायकवाड, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षिका श्रीमती असिया पट्टनकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २ व ३ ऑगस्ट २०२४ रोजी उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक फलटण व माण तालुका अंतर्गत ० ते १८ वयोगटातील शस्त्रक्रियेसाठी संदर्भित बालके व विद्यार्थी यांचे मोफत शस्त्रक्रिया शिबीर पार पडले. हे शस्त्रक्रिया शिबिर हे सायन हॉस्पिटल, मुंबई व उपजिल्हा रुग्णालय फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले. या शिबिरात १२६ बालकांवर एकूण १३६ शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.
या शस्त्रक्रियांमध्ये फायमोसिस, टंग टाय, हर्निया, हैड्रोसिल, अॅपेंडिक्स व इतर शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. या शिबिरामध्ये सायन हॉस्पिटल, मुंबई येथील डॉ. पारस कोठारी यांच्या टीमने या शस्त्रक्रिया पार पाडल्या. या टीममध्ये डॉ. मैत्रीयी सावे, डॉ. नंदिनी देसाई, डॉ. क्षीतिजा पोखरकर, डॉ. आकृती प्रभू, डॉ. आमीर खान, श्रीमती रुचिता शहा, श्रीमती कुमूद खडपे (समन्वयक) यांचा समावेश होता.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
हे शिबिर पार पाडण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय, फलटणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंशुमन धुमाळ, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा जगताप, डॉ. किरण फडतरे, डॉ. प्रमोद शहा, डॉ. किरण तारळकर, डॉ. धनंजय गायकवाड, डॉ. नरेंद्र तेली, डॉ. अदिती पाटील, डॉ. स्मिता शिंदे, डॉ. अनिता शेंडे, डॉ. मनोज कुंभार, डॉ. योगेश निकाळजे, डॉ. विमल गोरड, औषध निर्माता शिल्पा निंबाळकर, मंदार किकले, मनोज पाटील, सुप्रिया मोरे, दिपक ओंबासे, अजय भोसले, कुंदन चव्हाण, आरबीएसके पथकाच्या आरोग्यसेविका मंगल तांबे, ज्योती सकाटे, दीपाली कदम, रूपाली खलाटे, अनिता सत्रे, लक्ष्मी मोहिते, शोभा लोंढे तसेच उपजिल्हा रुग्णालयामधील मेट्रन प्रतिभा बरडे, इन्चार्ज सीस्टर स्वाती लंभाते, ओटी सीस्टर कल्याणी जाधव, मोनाली जाधव, रेखा महांगरे, संगीता म्हेत्रे, मनीषा फुलाटे, अनिल कर्णे औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शिरीष गुंजवटे, कृपाली भोसले, कौसर सय्यद, अश्विनी पलूसकर तसेच सहाय्यक अधीक्षक सुहास शुक्ला, लिपीक अमित भोगे, रुग्णालयातील सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी अजित यादव, निखिल वाघेला, अशोक मगर, नवनाथ करे, मयूर चव्हाण, सागर धोंडे, सारिका चोरमले, सर्व वाहनचालक, सफाई कर्मचारी, सिक्युरिटी स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.