दैनिक स्थैर्य | दि. १६ डिसेंबर २०२४ | फलटण | सातार्याचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर फलटणमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
फलटण येथील नाना पाटील चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा नेते श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर, श्रीमंत सत्यशीलराजे खर्डेकर यांनी फटाके वाजवून जल्लोष केला.
आनंदोत्सव साजरा करताना श्रीमंत धिरेंद्रराजे खर्डेकर म्हणाले की; आज श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांना मिळालेले मंत्रिपद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यालाच नाही तर सर्व महाराष्ट्रातील अठरापगड बारा बलुतेदारांना सन्मान देणारे हे मंत्रिपद आहे. या मंत्रिपदाचा उपयोग श्रीमंत शिवेंद्रसिंहराजेंच्या आधीच्या पिढीने म्हणजे श्रीमंत अभयसिंहराजे यांनी जनसामान्यांना न्याय देण्यासाठी केला होता तसेच श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे यांचेसुध्दा काम जनसामान्यांसाठीच राहील आणि फलटणकर हे त्यांच्या जावयाच्या पुढील वाटचालीची आतुरतेने वाट पाहत राहतील.
श्रीमंत धिरेंद्रराजे हे सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांचे चिरंजीव आहेत व श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर हे श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांचे मेव्हणे आहेत.