जागतिक महिला दिन निमित्त महिला मेळावा साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । १० मार्च २०२३ । सातारा । जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, भरोसा कक्ष पोलीस विभाग, नेहरु युवा केंद्र, एकात्मीक बालविकास प्रकल्प आणि नेचर अँड सोशल फाउंडेशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, ता. सातारा येथे “जागतिक महिला दिन” निमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.

या वेळी महिला उद्योग जिजाऊ क्वील्टस सेंटर व महिला मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मंगला धोटे यांचे हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थित महिलांना विधी सेवांचा लाभ घ्यावा व कायदेशीर सहाय्य मिळवण्यासाठी प्राधिकरणाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.

प्रकल्प अधिकारी लीनेश निकम यांनी सार्वजनिक उपयोगिता सेवा आणि शासकीय योजना अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेविषयी माहिती दिली.  तर सहा. पोलीस निरीक्षक अनिता मेनकर यांनी लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण आणि कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्याविषयी मार्गदर्शन केले.  अॅड. मनिषा बर्गे यांनी कामाचे ठिकाणी महिलांचे लैंगिक शोषण आणि बाल विवाह विरोधी कायदा विषयी मार्गदर्शन केले.   ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणता कायदा अंमलात आहे व त्या कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या सुविधा मिळतात याची माहिती दिली. कायद्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना मिळणा-या शासकीय योजना कोणत्या आहेत याची सखोल माहिती दिली.

यावेळी सेंटर फॉर सस्टेनेबल क्राफ्ट अँड रिसर्च  पुणेचे  संचालक नीरज बोराटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव तृप्ती जाधव,  भा.भ.वि.वि. संस्थेाचे कार्याध्यक्ष पद्मश्री लक्ष्मण माने  यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यानंतर न्यायालयीन कर्मचारी यांचा “विधी सेवा जागर” हा करमणूकपर प्रबोधनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पथनाट्य सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक   प्राध्यापक जीवन बोराटे  यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!