
दैनिक स्थैर्य । 26 एप्रिल 2025। फलटण । गिरवी नाका येथील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळांच्यावतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा शनिवार दि. 26 रोजी होणार असून यानिमित्ताने पहाटे 5 वाजता अभिषेक, महापूजा आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
पुण्यतिथी उत्सवानिमित्त सकाळी 9 वाजता रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वाजता स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण होईल. दुपारी 2 वाजता भजन सेवा होईल.
सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी महाआरती होणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे करण्यात आले आहे.