
दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज यांची ७२९ वी जयंती माळीमळा, आसू, (ता. फलटण) येथे भजन आणि महाप्रसाद कार्यक्रम घेवून मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.
प्रत्येक गावोगावी आणि वाडीवस्तीवर संत माळेतील पहिले संत श्री संत शिरोमणी सावता माळी यांची पुण्यतिथी समाजोपयोगी कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी, असे मत श्री संत सावता माळी युवक संघाचे माजी प्रदेश प्रवक्ते अजिंक्य फुले यांनी यावेळी मांडले.