इंडसइंड बॅंक च्या वतीने शिक्षक दिन साजरा


दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । बारामती । सोमवार दि. 05 सप्टेंबर रोजी बारामती येथील इंडसइंड बॅंक बारामती शाखेच्या वतीने तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती या ठिकाणी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर यांच्यासह इतर इतर प्राध्यापक उपस्थित होते यावेळी बँकेचे शाखा अधिकारी किरण फडतरे, विशाल वाबळे दिपाली जाधव अनिकेत धमे पृथ्वीराज चव्हाण इत्यादी बँक अधिकारी यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

बँक नेहमी ग्राहकाच्या सेवेसाठी तत्पर असून सामाजिक भान जपत वर्षभरात विविध उपक्रम राबवित असल्याचे शाखा व्यवस्थापक किरण फडतरे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!