स्थैर्य, कोळकी दि.7 : शिवस्वराज्य दिनानिमित्त कोळकी (ता.फलटण) ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सरपंच सौ.विजया नाळे यांच्या हस्ते स्वराज्यगुढीचे पुजन व स्वराज्यगुढीस श्रीफळ वाढवून शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राज्य शासनाने 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिवस म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय घेतला असून आज राज्यत हा दिन साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगवडावर शिवराज्याभिषेक झाला. त्यांनी संर्घषातून स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या विचारधारा कायमस्वरुपी सर्वांसाठी आदर्शवत अशीच आहे, असे सरपंच सौ.विजया नाळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांची उपस्थिती होती.