
दैनिक स्थैर्य | दि. ३ मार्च २०२३ | फलटण |
गेल्या २८ वर्षांपासून भाजपचा गड मानल्या जाणार्या कसबा मतदारसंघात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. कसबा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर हे ११ हजार ४० मतांनी जिंकले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे हेमंत रासने यांना पराभवाची धूळ चारली आहे. त्यामुळे राज्यभरातच महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार धंगेकरांच्या विजयाबद्दल फलटण येथेही विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी महापुरूषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, शहराध्यक्ष पंकज पवार, जिल्हा सरचिटणीस शंकरराव लोखंडे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गंगाराम रणदिवे, युवक शहराध्यक्ष प्रीतम जगदाळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष विकास ननावरे, कार्यकारणी सदस्य बाल मुकुंद भट्टड, अजय इंगळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे फलटण तालुका प्रमुख विकास नाळे व प्रदिप झणझणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.