डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये महाराष्ट्र कृषी दिन अनोख्या उपक्रमाने साजरा..!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । दापोली ।  १ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त व माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्रातील हरितक्रांती चे जनक असलेले वसंतराव नाईक यांच्या जयंतनिमित्त राष्ट्रीय छात्र सेना दल, कृषी महाविद्यालय दापोली यांच्या मार्फत करदे ग्रामपंचायत, करदे येथे वृक्षारोपण  कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ७:०० ते १२:०० या वेळेत करण्यात आले. या सत्राला मा. कुलगुरू (डॉ.बा.सा.को.कृ.वी , दापोली) कर्नल कमांडंट डॉ. एस.डी.सावंत सर यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, तसेच या कार्यक्रमाचे इतर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राणे सर (वनशास्त्र महाविद्यालय) , डॉ. पी.ए सावंत सर (प्रमुख , विस्तार शिक्षण विभाग), डॉ.प्रवीण झगडे (कनिष्ठ संशोधक सहाय्यक) , मा. सचिन तोडणकर सर (सरपंच , करदे ग्रामपंचायत) आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाचा सहभाग दर्शविला.
वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने वनशास्त्र महाविद्यालय , दापोली मार्फत समुद्र किनाऱ्यावरची धूप टळण्यासाठी एकूण २०० रोपे , राष्ट्रीय छात्र सेना दलाला प्रदान करण्यात आली , त्यामधे मुख्यतः करंज आणि उंडी च्या रोपांची लागवड करण्यात आली. या सर्व कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व कॅडेट्स ने मोलाची कामगिरी बजावली व निसर्गाप्रतीच्या आपल्या कर्तव्याचे यथोचित पालन केले.


Back to top button
Don`t copy text!