दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२१ | सातारा | करोनाची स्मृती बाजूला ठेवत प्रकाश आणि जल्लोष यांची उधळणं करणाऱ्या दीपोत्सवाची गुरुवारपासून सुरवात होत आहे . या प्रकाश महोत्सवाच्या स्वागतासाठी सातारकर आतुर असून संपूर्ण सातारा शहर आकाश कंदिल आणि दिव्यांच्या प्रकाशात लखलखले आहे .करोनाची भीती संपूर्णपणे बाजूला ठेऊन सातारकरांनी मात्र खरेदीवर जोर दिला आहे .
साताऱ्यात यंदा दिवाळी जोरदार होणार असून बाजारपेठेत तेजीचे वातावरणं आहे . करोनाचा जिल्हयाचा संसर्ग दर दीड टक्क्यावर असल्याने सातारकरांनी भीती बाजूला ठेऊन दिवाळीची खरेदी आणि पण पण त्यांची आरास आणि लक्ष्मी पूजनाच्या पारंपारिक स्वागताची तयारी केली आहे . यंदा नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन गुरूवारी ( दि 4 ) आले आहे . अश्विन अमावस्या पहाटे साडेतीन वाजता सुरू होत असून चित्रा नक्षत्राचा हा दिवस शुभ मानला जातो . यंदा लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त सायं 6 ते रात्री 8.34 पर्यंत आहे . सायंकाळी साडेसात पर्यंत अमृत मुहूर्त असल्याने या दरम्यान लक्ष्मी पूजन करावे हे ब्रम्हवृंदांनी कळविले आहे . नरक चतुर्दशी सुद्धा गुरुवारीच आल्याने वामना सह सहा इष्ट देवतांच्या पूजेचे महत्व आहे . यमदीपदानं म्हणून घराचे आवार दिव्यांनी उजळविण्याची परंपरा आहे . या पूजेचा मुहूर्त सकाळी 6.15 ते8.30 व सायंकाळी 7.00 ते 8.45 पर्यंत आहे . सातारकरांनी . पारंपारिक पध्दतीने दिवाळीच्या स्वागताची तयारी केली आहे . दोन वर्ष लॉक डाऊन व करोना संसर्गाची भीती यामुळे यंदाच्या दिवाळीचा उत्साह प्रचंड आहे . विविध प्रकारचे आकाशकंदिल, आकर्षक पणत्या, सुगंधी तेलं व साबण उटणे खास भेटवस्तू, मिठाई व फराळाचे बॉक्स याची भरभरून खरेदी सातारकरांनी केली आहे .
राजपथावर देवी चौक ते मोती चौक आणि खणं आळी येथे मंगळवारी रात्री पासून सातारकरांच्या गर्दीमुळे पाय ठेवायला जागा नाही . अरूंद रस्त्यामुळे मोती चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून ट्रॅफिक पोलीसांची दमछाक होत आहे . कर्मवीर पथावर सुध्दा नागरिक रस्त्यावर असल्याने गर्दीच गर्दी जाणवत आहे .आकाशकंदिल, कपडे पणत्यापासून ते इलेक ट्रॉनिक वस्तू नवीन दुचाकी, चारचाकी गाडयांच्या खरेदीची बाजारपेठेत धूम सुरू आहे . घराघरातून फराळाच चा घमघमाट जाणवत असून यंदाची दिवाळी दणक्यात साजरी होणार हे निश्चित दिसत आहे.