नरसोबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंसंस्थेचा ८ वा वर्धापन दिन श्रीमंत संजिवराजेंच्या उपस्थितीत साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ जुन २०२२ । फलटण । कै. श्रीमंत विजयसिंह मालोजीराजे नाईक निंबाळकर उर्फ शिवाजीराजे यांच्या उत्कट इच्छा व प्रेरणेने, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कोळकी (ता. फलटण) भागातील लोकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी दिनांक 2 मार्च 1995 रोजी नरसोबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. या पतसंस्थेच्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन 8 वर्षांपूर्वी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाले होते. या इमारतीचा आज 8 वा वर्धापन दिन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

यावेळी कोळकीचे जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, फलटण एज्युकेशन सोसायटी गव्हर्निंग कौन्सीलचे सदस्य डॉ. प्राश्वनाथ राजवैद्य (गुंगा), श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे, सगुणामाता उद्योग समूहाचे संचालक दिलीप शिंदे यांच्यासह नरसोबा पतसंस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

27 वर्षांहून अधिक काळापासून ‘विना सहकार नही उद्धार’ या सहकाराच्या ब्रिद वाक्यानुसार पतसंस्था चोख आणि प्रगतीकारक कारभार पार पाडत आहे. पतसंस्थेच्या दैनंदिन व्यवहारामध्ये ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, कोळकीचे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे आदी मान्यवरांचे प्रामुख्याने मार्गदर्शन लाभत असते.

संस्थेचे सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे संस्थेचा कारभार उत्तमरित्या चालवण्यात संस्थेचे चेअरमन संजय नाईक निंबाळकर, व्हाईस चेअरमन दिलीप नाळे, संचालक विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्‍वर मुळीक, दगडू थोरवे, जयसिंग शिंदे, उमेश काशिद, सुरेश शिंदे, हणमंत मदने, बाबासो निंबाळकर, शिवाजी सावंत, सौ.माणिक सपाटे, सौ.मंदाकिनी खलाटे, व्यवस्थापक रविंद नाळे यांना यश मिळत आहे.

दिनांक 31 मार्च 2022 अखेरची आकडेवारी पाहता संस्थेची चढती कमान अधोरेखित होते. 2 हजार 497 सभासद संख्ये असलेल्या नरसोबा पतसंस्थेचे खेळते भांडवल रुपये 47 कोटी 66 लाख 85 हजार 419 इतके असून संस्थेकडे रुपये 36 कोटी 66 लाख 40 हजार 248 इतक्या ठेवी असून रुपये 27 कोटी 66 लाख 57 हजार 043 इतक्या रक्कमेचे कर्जवाटप करण्यात आले आहे. रुपये 17 कोटी 18 लाख 17 हजार 122 इतकी संस्थेची गुंतवणूक असून संस्थेस या आर्थिक वर्षात रुपये 53 लाख 17 हजार 130 इतका नफा झाला आहे. या प्रगतीदर्शक व पारदर्शक कारभारामुळे संस्थेस ऑडिट वर्ग ‘अ’ सातत्याने राखण्यात यश मिळत आहे.

संस्थेची स्वमालकीची सुसज्ज इमारत असून सभासदांना विनम्र व तत्पर सेवा देण्यास संस्थेचे कर्मचारी वृंद नेहमीच प्रयत्नशील असतात. संस्थेचे कामकाज संपूर्ण संगणकीकृत असून मुदतठेवींवर आकर्षक व्याजदर, तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध कर्ज योजना, हायरपरचेस कर्जाची सुविधा, ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 1% जादा व्याज, ज्येष्ठ नागरिकांना बँकींगविषयक घरपोच सुविधा ही या संस्थेच्या कामकाजाची ठळक वैशिष्ठ्ये असल्याने सभासद पतसंस्थेच्या कारभाराविषयी समाधानी आहेत.

श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक (फलटण), सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आय.सी.आय.सी.आय. बँक या बँकांमध्ये संस्थेची सुरक्षित गुंतवणूक असून या बँकांचे मार्गदर्शनही पतसंस्थेच्या कामकाजात वेळोवेळी मिळत असते.

आज, गुरुवार दि.23 जून 2022 रोजी संस्थेच्या सुसज्ज नूतन इमारतीचा 8 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. त्यानिमित्त संस्थेचे प्रवर्तक, पदाधिकारी, संचालक, सभासद, कर्मचारी व हितचिंतक या सर्वांना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शुभेच्छा यावेळी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!