दैनिक स्थैर्य । दि.३१ जानेवारी २०२२ । लिंब । गौरीशंकर नॉलेज सिटीचे चेअरमन मदनराव जगताप यांनी सन 2007 रोजी लिंबच्या उजाड माळरानावर गौरीशंकर रुपी ज्ञानमंदिराची मुहूर्तमेढ रोवली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत या ठिकाणी विविध अभ्यासक्रमावर आधारित उच्च शिक्षणाची दालने खुली केली. सातारच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या गौरीशंकर ने अल्पवधित संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळविला इंजिनीअरिंग फार्मसी एम.बी. ए सारख्या उच्च शाखेचे ज्ञान केंद्र उभारून शहरी व ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय केली त्यामुळे या भागाचा संपूर्ण कायापालट होऊन विद्यार्थ्यांची उज्वल करिअर हि घडले अशा संस्थेच्या 31जानेवारी 2022 रोजी 14 वा वर्धापन दिन संस्थेचे चेअरमन मदनराव जगताप ,संचालक अनिरुद्ध जगताप प्रशासकीय अधिकारी नितीन मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी ,उपप्राचार्य योगेश गुरव, प्राचार्य विजय राजे , प्राचार्या नवनिता पटेल प्राचार्या दिप्ती बर्गे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
शैक्षणिक क्षेत्रातील मागील 14 वर्षे संस्थेने अनेक चढउतार अनुभवले आहेत त्यावर मात करीत संस्थेची यशस्वी घौङदौङ सुरू आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने कॅम्पसमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले धन्वंतरी पूजन ,वृक्षारोपण तसेच देगाव येथील समता वृध्दाश्रम संस्थेमधील वृध्दाना फॅन चादरी वाफेरे मशीन सह 10हजार रू पर्यंत चे साहित्य वाटप संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री काटेकर प्राचार्य डॉ.अजित कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी समता वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा संगीता माने, उपप्राचार्य योगेश गुरव, डॉ. राहुल जाधव, डॉ भूषण पवार ,प्रा, स्वप्नाली झोरे प्रा.स्नेहल सांवत व विद्यार्थी याची प्रमुख उपस्थिती होतो.सदर कार्यक्रम आजादी अमृत महोत्सव अंतर्गत व राष्ट्रीय सेवा योजना मार्फत घेण्यात आला.
प्रारंभी कॅम्पसमध्ये संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले .वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ङाॅ भूषण पवार व आभार प्रा.स्वप्नाली झोरे यांनी केले.