
दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । फलटण । मौजे झडकबाईचीवाडी ता. फलटण येथे अत्यंत उत्साहात ग्रामस्थांच्या वतीने व शिवशंभो ग्रुप झडकबाईचीवाडी यांच्या वतीने प्रथमच छत्रपती संभाजी राजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अत्यंत पारंपारिक पद्धतीने ढोल लेझीमच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभूराजे यांच्या विजयाच्या उद्घोष करत जयंती संपन्न झाली. यावेळी किल्ले पुरंदर वरून शिवज्योतीचं प्रज्वलन करून आणण्यात आली होती. शिवशंभो ग्रुप च्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले. शाळेतील वा अंगणवाडीतील लहान मोठ्या मुलांनी नृत्य केली. अंगणवाडीच्या मदतनीस काळे मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली. तुझ्या संपूर्ण परिसरामध्ये भगव्या पताका व झेंडे लावून वेगवेगळ्या पद्धतीने सजावट केली होती.
छत्रपती संभाजी महाराज जयंती महोत्सव अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी शिवाजी मुळीक, गणेश कदम, घनश्याम मुळीक, गौरव शिंदे, अक्षय कदम, चैतन्य कदम यांनी विशेष मेहनत घेतली. अत्यंत शांततेत व उत्साहात छत्रपती संभाजी राजांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती संभाजी राजांची प्रथमच जयंती साजरी करण्यात येत असून पुढील वर्षी मोठ्या स्वरूपात जयंती साजरी करण्याचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संकल्प व्यक्त केला. पुढील वर्षी विविध स्पर्धांचे आयोजन, व्याख्यानमाला व कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प केला. यावेळी ग्रामस्थ, महिला व तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.