सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 11 वा वर्धापन दिन साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ८: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 11 वा वर्धापन दिन कोयनानगर येथे साजरा करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे मुखपत्र असलेल्या सह्याद्री वार्ता या मासिकाचे वनसंरक्षक समाधान चव्हाण यांच्या हस्ते डिजिटल स्वरूपात प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक उत्तम सावंत, कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव फाळके, कोयना जलविद्युत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ब्रम्हानंद कोष्टी, सीताराम झुरे आदी उपस्थित होते.

यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची वाटचाल या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या भविष्यातील विकासकामे व व्यवस्थापनाबाबत उपस्थितांनी आपले अनुभव सांगितले व सूचना दिल्या. याप्रसंगी वन्यजीव सप्ताह 2020 च्या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देवून गौरवण्यात आले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात काम केलेल्या सेवानिवृत्त वनअधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कार्यरत असलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांपैकी उत्कृष्ट काम केलेल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.

निसर्गप्रेमी नाना खामकर, रोहन भाटे तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यातील अशासकीय संसथांचे प्रतिनिधी, निसर्ग मार्गदर्शक, विद्यार्थी, सह्याद्री प्रकल्पात काम केलेले सेवानिवृत्ती अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!