सामाजिक उपक्रमातून देसाई इस्टेट मध्ये शिवजयंती साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२३ मार्च २०२२ । बारामती । आर्थिक दृष्ट्या कमकवुत वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून शिवजयंती साजरी करणे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.

देसाई इस्टेट शिवजयंती महोत्सव कमिटी च्या वतीने सोमवार २१ मार्च रोजी शिवजयंती निमित्त ‘शिवपूजन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या वेळी कांबळे बोलत होते.

या प्रसंगी पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अधीक्षक हनुमंत पाटील,नगरसेवक अतुल बालगुडे,जयसिंग देशमुख,अमर धुमाळ व दीपक मलगुंडे, श्रीरंग जमदाडे,शैलेश बागडे,प्रमोद ढवाण,सुनील शिंदे,दिलीप शिंदे,ऍड गुलाबराव गावडे,प्रकाश गजाकस,बाळासाहेब वायसे,अविनाश लगड,छगन आटोळे आदी मान्यवर उपस्तीत होते
शिवजयंती निमित्त डीजे किंवा रोषणाई,सजावट वर खर्च करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवून परिसरातील आर्थिक कमकवुत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचे धोरण असल्याचे आयोजक नगरसेवक अतुल बालगुडे यांनी सांगितले. अमोल पवार व संग्राम खंडागळे यांनी उपस्तितांचे स्वागत केले तर आभार अनिल सावळेपाटील यांनी मानले


Back to top button
Don`t copy text!