योग प्रात्यक्षिक च्या माध्यमातून शिवजयंती साजरी


दैनिक स्थैर्य । ११ मार्च २०२३ । बारामती । भारताने जगाला दिलेली महान देणगी म्हणजे योग होय योगाच्या माध्यमातून अनेक व्याधी दूर होतात योग करा व निरोगी जीवन जगा हा संदेश देत आचार्य द्रोणाचार्य योगा क्लब च्या सदस्यांनी शिवजयंती निमित्त प्रात्यक्षिके सादर करून व प्रबोधन करून शिवजयंती साजरी केली.

१० मार्च रोजी सिनेमा रोडवरील न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान च्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी जिल्हा क्रीडा संकुल येथील आचार्य द्रोणाचार्य योगा क्लब च्या वतीने शिवजयंती मिरवणुकीत सहभागी असलेल्या उपस्तीत शिवभक्तां साठी योग व जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली त्यानंतर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, गड किल्ले संवर्धन साठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी योग प्रशिक्षक शिवानी काटकर व सहकारी विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.न्यू युवा शिवक्रांती प्रतिष्ठान चे अध्यक्ष हेमंत नावसरे यांनी उपस्तितांचे स्वागत केले.
फोटो ओळ: योग प्रात्यक्षिक सादर करताना विद्यार्थी


Back to top button
Don`t copy text!