दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । नवरात्रोत्सवामध्ये सर्वत्र देवीची ओटी भरण्यात येत असते. परंतू कारागृहातील महिला बंद्यांसाठी इनरव्हील क्लब, सातारा व इनरव्हील क्लब, पांचगणी यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहातील महिला बंद्यांसाठी दैनंदिन वापराच्या वस्तूंनी ओटी भरून एक आगळावेगळा उपक्रम करण्यात आला.
इनरव्हील क्लब, सातारा यांच्या माध्यमातून सातारा जिल्हा कारागृहातील महिला बंद्यांसाठी 1. शिलाई मशीन व त्याचे साहित्य भेट देण्यात आले. तसेच इनरव्हील क्लब, पाचगणी यांच्या माध्यमातून कारागृहातील महिला बंद्यांसाठी त्यांच्या दैनंदिन वापर करिता 25 टॉवेल, 50 नग अंघोळीचे साबण, 50 नग कपडे धुण्याचे साबण, 25 नग पेटिकोट, 50 नग टूथपेस्ट आणि ब्रश इत्यादी साहित्य महिला बंद्यांना भेट देण्यात आले आहे.
कारागृहात असे कार्यक्रम घेण्यामागे कारागृहाचे ब्रिद वाक्य “सुधारणा पुनर्वसन” हे असून करागृहातील महिला बंद्यांना गुन्हेगारीतून बाजूला करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हेच आहे. नवरात्रमधील या कार्यक्रमामुळे कारागृहातील महिला बंदिनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास इनरव्हील क्लबच्या सातारा प्रेसिडेंट प्राची शहा, पाचगणी प्रेसिडेंट संगीता पाटील, शकुंतला कासट, स्वरुपा पोरे, शिल्पा गांधी, मनीषा शिंदे, चांदणी थादानी, सुजाता मुळे तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, तुरुंगअधिकारी राजेंद्र भापकर, महिला शिपाई वैशाली जाधव, लता काळकुटे इत्यादी उपस्थित होते.