
स्थैर्य, फलटण : दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांची आरास, आप्तजनांच्या भेटी आणि फराळाची लज्जत! या पारंपारिक फराळात यंदा ‘आईच्या प्रेमाची चव’ घेऊन आला आहे देवत्व बेकरीचा सुप्रसिद्ध मावा केक. हा केक तुमच्या दिवाळीच्या फराळाची चव वाढवून सणाचा आनंद द्विगुणीत करेल, यात शंका नाही.
दिवाळीच्या फराळासोबत काहीतरी नवीन आणि तितकेच चविष्ट देण्याच्या उद्देशाने, हा खास मावा केक आता फलटणकरांसाठी उपलब्ध झाला आहे. मऊ, लुसलुशीत आणि योग्य प्रमाणात गोड असलेला हा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या पसंतीस उतरेल.
या दिवाळीत आपल्या घरी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी किंवा आप्तस्वकियांना भेट देण्यासाठी देवत्व बेकरीचा मावा केक हा एक उत्तम पर्याय आहे. हा खास केक आता शहरातील कसबा पेठेतील बुरुड गल्ली येथील ‘भक्ती एन्टरप्रायजेस’ येथे उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी पत्रकार यशवंत खलाटे-पाटील यांच्याशी ९८२२९७३३४४ किंवा ९४२१२१३६५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.