सातार्‍यातील रविवार पेठ मंडईवर सीसीटीव्हीचा वॉच

सातारा नगरपालिका प्रशासन व पोलिसांनी वादावर टाकला पडदा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 19 एप्रिल 2025। सातारा। येथील रविवार पेठेतील भाजी मंडई सुव्यवस्थापित करण्याकरिता सातारा पालिकेने सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह अन्य सुविधा देण्याचे मान्य केले आहे. शेतकरी व व्यापारी यांच्यातील संघर्ष समन्वयाने सोडवून पोलीस व पालिका प्रशासनाने या वादावर पडदा टाकला. मंडईच्या प्रवेशद्वाराजवळील हातगाड्यांची अतिक्रमणे काढण्याचा आदेश

मंडईतील सुविधांबाबतही चर्चा या बैठकीत मंडईतील सुविधांची चर्चा झाली. मंडईतील शौचालयाची व्यवस्था नीट होत नसल्याची तक्रार झाली. तेथे स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा देण्याचे निर्देश देण्यात आले. मंडईच्या डाव्या बाजूला शेतकर्‍यांना ठरवून दिलेल्या दोन ओळींमध्येच शेतकर्‍यांनी आपल्या मालाची विक्री करावी. तेथे भिंतीलगत व्यापार्‍यांनी अतिक्रमण करू नये, असे स्पष्ट निर्देश या बैठकीत मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिले.
परिसरातील अतिक्रमणे हटवणे, पेव्हर ब्लॉक टाकून जमीन समतल करणे, सुरक्षिततेच्या दृष्टीने सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, भाजीपाल्याचा कचरा टाकण्यासाठी डस्टबिन ठेवणे इत्यादी सुविधा दिला जाणार आहेत. व्यापारी व शेतकर्‍यांनी समन्वयाने काम करून, मंडईच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी केले.

रविवार पेठ भाजी मंडईत शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये मालाच्या विक्रीसाठी जागेवरून सातत्याने वादावादी होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांना गोळ्या घालून ठार मारण्याची भाषा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. याप्रकरणी शहर पोलिसांनी रोहित नाईक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिसांच्या समन्वयाने येथील शिवतेज हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, मुख्याधिकारी अभिजित बापट, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, व्यापारी उपस्थित होते.

या ठिकाणी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!