स्थैर्य, नवी दिल्ली, दि. ०८ : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग लक्षात घेता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सीबीएसई बोर्डने 30 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा भार येऊ नये यासाठी सीबीएसई इयत्ता 9वी ते 12वी चा अभ्यासक्रम 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी 30 टक्के कमी करणार असून महत्त्वाच्या विषयांच्या संकल्पना अभ्यासक्रमात राहणार आहेत.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे. नॅशनल काऊन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (NCERT) सीबीएसई बोर्डला सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यास मदत केली आहे.