स्थैर्य, दि.२: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) मंगळवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली. वेळापत्रकानुसार 4 मे पासून 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. 10 वीची परीक्षा 7 जूनपर्यंत तर 12 वीच्या परीक्षा 11 जूनपर्यंत चालणार आहेत.
10 वीचे वेळापत्रक
12 वी परीक्षेचे वेळापत्रक
31 डिसेंबर रोजी जाहीर झाली होती परीक्षेची तारीख
शिक्षणमंत्र्यांनी 31 डिसेंबर रोजी एका लाइव्ह वेबिनारमध्ये CBSE च्या 10 वी आणि 12 वी बोर्डच्या परीक्षांची तारखांची घोषणा केली होती. दोन्ही वर्गांची प्रॅक्टिकल परीक्षा 1 मार्चपासून सुरू होणार आहे. 15 जुलै पर्यंत निकाल जाहीर होईल.
अधिकृत वेबसाइटवरून असे डाउनलोड करा वेळापत्रक
1. सर्वात आधी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या.
2. ‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करुन आपला वर्ग निवडा.
3. यानंतर तुमच्या वर्गाप्रमाणे इयत्ता दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल.
4. या ठिकाणी तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करु शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करु शकता.