स्थैर्य, फलटण : राज्याच्या विविध भागातून पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक भक्त येत असतात. आळंदी ते मोहोळ हा पालखी मार्ग महामार्ग होत आहे. त्या ठिकाणी महामार्ग होत असताना नगरपंचायत व ग्रामपंचायत हद्दीतील जमीन धारकांसाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. माळशिरस नगरपंचायत येथे वेगळा दर मिळत आहे तर तेथून पाचशे मीटर वर असलेल्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये वेगळा दर मिळत आहे. त्या मुळे या बाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. या ठिकाणी महामार्गाच्या कामामध्ये कार्यरत असणारे अधिकारी हे भ्रष्टाचार करीत आहेत. तरी या सगळ्याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये केली.