कार्याध्यक्ष आमिरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त 37 लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ जानेवारी २०२२ । फलटण ।  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे फलटण तालुका कार्याध्यक्ष आमिरभाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नेत्र तपासणी शिबिरात 37 लोकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता लागल्याने त्यांना आज मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी पुणे येथील एच व्ही देसाई हॉस्पिटल मध्ये विशेष गाडीतून पाठविण्यात आले.

अमीरभाई शेख याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 31 डिसेंबर रोजी नेत्र तापसणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळेस ३७ लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याची गरज भासवली. त्या अनुषंगाने दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० वाजता फलटण येथुन ऑपरेशन करण्यासाठी लोकांना पुणे येथील एच. व्ही. देसाई येथील हॉस्पिटल पाठवित आले.

यावेळी अमीरभाई शेख, जेष्ठ मार्गदर्शक सदाशिव जगदाळे, फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष ताजुभाई बागवान, शहर अध्यक्ष अल्ताफ पठाण, युवा नेते बबलू मोमीन, डॉ. शरद शिंदे, बारव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप कर्णे, शिवराज मुळीक, कर्णे उपस्थित होते. पुणे येथे सर्वांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित रुग्णांनी आमिरभाई शेख यांना आशीर्वाद देऊन धन्यवाद दिले.


Back to top button
Don`t copy text!