दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । मुंबई । देशाच्या स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या राजकीय पक्षांनी जातीय भेदभाव, अस्पृश्यता मुक्त भारताच्या संकल्प कधी केला नाही.भाजप सत्तेवर आली तर कॉंग्रेसमुक्तीचा, तर कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर सांप्रदायिक द्वेष,आरएसएस मुक्त भारताचा संकल्प करते.स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या कुठल्याही पक्षाने अस्पृश्यता, जातीय भेदभाव, गरीबी, बेरोजगारी, दलित महिला अत्याचार मुक्तीची साधी चर्चा देखील केली नाही. पंरतु, सर्वजनाच्या हितासाठी आणि सर्वजनाच्या सुखासाठी केवळ बसपाच पक्ष स्थापनेपासून प्रयत्नरत्न आहे,असे प्रतिपादन बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव, माजी खासदार, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी डॉ.अशोक सिद्धार्थ साहेब यांनी शुक्रवारी केले. बसपा पुणे जिल्ह्याच्यावतीने येरवडा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित ‘भ्रष्टाचार मुक्त पुणे’संकल्पासाठी आयोजित भव्य कार्यकर्ता मेळाव्याला डॉ.सिद्धार्थ यांनी संबोधित केले.यावेळी विचारपीठावर प्रदेश प्रभारी मा.नितीन सिंह साहेब, प्रदेश प्रभारी प्रमोद रैना साहेब, प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेब तसेच प्रदेश प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी साहेब उपस्थित होते.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमाच्या सुरूवातील राष्ट्रध्वज हातात घेवून उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रगीत गात देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पुढे उपस्थितांना संबोधित करतांना डॉ.सिद्धार्थ म्हणाले की,आजही शोषित, पीडित, उपेक्षित खऱ्या अर्थाने स्वतंत्र आहेत का? याचा विचार करण्याची गरज आहे. मनुष्यांकडूनच आजही गटारे स्वच्छ करून घेतली जात आहे.शेकडो लोकांचा त्यामुळे मृत्यू होतोय.आजही अनेक ठिकाणी दलित, शोषितांसोबत भेदभाव केला जातो. हे सर्व थांबवण्यासाठी तसेच देश आणि पुण्याला भ्रष्टाचारामुक्त करण्यासाठी केंद्रात बसपाचे सरकार महत्वाचे आहे.पुण्यात बसपाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवून आल्यानंतर जिल्हा भ्रष्टाचारमुक्त होईल.त्यामुळे मोठ्यासंख्येत बसपाचे नेतृत्वात सभागृहात पोहचवण्याचे आवाहन,डॉ.सिद्धार्थ यांनी केले.सर्वांना मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेबांनी केलेला संघर्ष. त्यांचा हा संषर्घ संग्रामापेक्षा कमी नाही. अशात महानपुरुषांच्या जम्नभूमीत फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालत मा.बहन सुश्री मायावती जी यांच्या नेतृत्वात बसपाचे हात बळकट करण्याचे आवाहन यानिमित्ताने डॉ.सिद्धार्थ साहेबांनी केले.
कार्यक्रमात प्रदेश महासचिव मा.सुदीप गायकवाड, मा.अप्पा साहेब लोकरे, प्रदेश सचिव मा.भाऊ शिंदे, मा.अजित ठोकळे, मा.सुरेश दादा गायकवाड, मा.बाळासाहेब आवारे,मा. शीतल ताई गायकवाड, कार्यालयीन सचिव मा.अभिजित मनवर, जिल्हाध्यक्ष मा.रमेश आप्पा गायकवाड, मा.अशोक गायकवाड, मा.मेहमूद जकाते, मा.सागर खंडे, मोहमद शफी, मा.बापू कुदळे, मा.निधी वैद्य, सुरेखा कांबळे, सिद्धार्थ कांबळे, प्रीतम सेठ धारिया तसेच प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा निळा झेंडा सभागृहात पोहचणार-अँड.ताजणे
डॉ.बाबासाहेबांची निशाणी असलेला निळाझेंडा आणि बसपाचे हत्ती निवडणूक चिन्ह असलेल्या ध्वज यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर फडकेल, असा दावा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेबांनी केला.राष्ट्रीय पक्ष असलेल्या बसपाची नाळ पुण्याच्या मातीशी जुळली आहे. मान्यवर कांशीराम साहेबांनी पुण्याच्या भूमितूनच बसपाच्या विचारधारेला गती दिली होती. पंरतु,फुले-शाहू-आंबेडकरांची कर्मभूमी असूनही अजूनही राज्यात निळा झेंडा फडकवता आलेला नाही याची सल मनात कायम आहे. आता मात्र निर्धार करायचा आहे. महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र, पुणे हा साखरपट्टा आणि कारखानदारांचे क्षेत्र नाही तर डॉ.बाबासाहेबांच्या विचारांना गतीमान करणाऱ्या स्वाभीमान लोकांचा असल्याची ओळख देशभर निर्माण करा, असे आवाहन अँड.ताजने यांनी केले.अवघ्या दीड महिन्यांच्या कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका येवून ठेपल्या आहे. आता आणखी वेगाने आणि सक्रियतेने काम करण्याचे आवाहन यानिमित्ताने त्यांनी केले. बहुजन तसेच महिला स्वाभीमानाच्या प्रतिक असलेल्या मा.बहन मायावतीजींच्या मार्गदर्शनात बसपाच्या नेतृत्वातील सरकार राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आणण्याचे आवाहन अँड.ताजने यांनी केले.
मताचे मूल्य ओळखा-प्रमोद रैना
स्वातंत्र प्राप्तीनंतर कॉंग्रेसने काही धनदांडग्यांना हाताशी धरून त्यांच्या सोयीचार कारभार चालवला. एससी,एसटी, ओबीसींना हक्कापासून दूर ठेवले. कॉंग्रेसचा हा अत्याचार विसरता येणार नाही. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २०१४ मध्ये सर्वसामान्यांच्या बॅक खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. पंरतु, ते अद्याप जमा झालेले नाही. गरीबांचे बॅंके खाते उघडली.पंरतु, हे पैसे सरकारने बुडवले. त्यामुळे मताचे मूल्य ओळखण्याची गरज निर्माण झाली आहे. बसपाच्या सच्च्या समाजसेवकाला मतदान केले तरच भ्रष्टाचार आपोआप संपुष्टात येईल, असे मत प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांनी व्यक्त केले.
जातीय,धार्मिक,व्यावहारिक भ्रष्टाचार संपुष्टात आणा-नितीन सिंह
देशाच्या विकासात बसपा आणि बहुजन समाज कधीच मागे राहीला नाही. महापुरूषांनी समतेचा संघर्ष करतांना देशाच्या सन्मानाला लांच्छन लागणार नाही असे कुठलेही कृत केले नाही. देशात फोफावलेल्या भ्रष्टाचाराचे मुख्य कारण जातीय भेदभाव आहे. जातीय,धार्मिक भेदभावातून भ्रष्टाचाराची सुरूवात होते. बंधुभाव त्यामुळे महत्वाचा आहे. जातीय,धार्मिक, व्यावहारीक भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याची आवश्यकता आहे. केवळ पाच वर्षात मा.बहन मायावती जी हे करू शकतात. केंद्रात सत्तेवर येताच संपुर्ण देशाचा कायापालट होवून भ्रष्टाचारमुक्तीचे नेतृत्वात मा.बहनजीच करू शकतात, असे प्रतिपादन प्रदेश प्रभारी नितीन सिंह यांनी केले.
भ्रष्टाचारमुक्त पुण्यासाठी बसपाच पर्याय-डॉ.चलवादी
केवळ भ्रष्टाचारामुळेच महामानव डॉ.बाबासाहेबांनी गोरगरीब, पीडित, शोषितांना दिलेल्या अधिकारांपासून ते वंचित आहेत.स्वातंत्र्यानंतर देखील अनेकांना साध्या जातीच्या दाखल्यासाठी प्रशासनाच्या पायर्या झिझवाव्या लागत आहेत. सातबारासाठी लाच दिली नाही फेरफार केला जात नाही. मुलभूत सुविधा, अधिकार शासनाकडून मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. केवळ लाच देणार्यांचे कामं होतात. अशात परिर्वतनासाठी बसपाच एकमेव पर्याय आहे. बसपाच्या माध्यमातून पुण्याला भ्रष्टाचारामुक्त केले तर येणारा काळ हा आशावादी असल्याचे मत प्रदेश प्रभारी डॅा.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केले.
डॉ.सिद्धार्थ यांचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनरत्न पुरस्काराने सन्मान
बहुजन चळवळीसाठी रक्ताचे पाणी करणारे बसपाचे राष्ट्रीय महासचिव मा.डॉ. अशोक सिद्धार्थ साहेबांना कार्यक्रमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रदेश प्रभारी नितीन सिंह यांना पुणेरत्न पुरस्काराने तसेच प्रदेश प्रभारी प्रमोद रैना यांना शाहुरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नेत्यांना मानपत्र देवून तसेच फुले पगडी घालून सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड यांनी तर प्रास्ताविक डॉ.चलवादी यांनी केले.