भांडणे सोडविण्यास गेलेल्या महिलेला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण; एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २१ एप्रिल २०२३ | फलटण |
भांडणे सोडविण्यास गेलेल्या महिलेच्या अंगावर थुंकून तिला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करत धमकी दिल्याप्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणाची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. १८ एप्रिल रोजीच्या रात्री १०.०० वाजण्याच्या सुमारास आरोपी याने दारू पिऊन येऊन फिर्यादी महिलेचे दीर नितीन रणदिवे यांच्या घरासमोर येऊन दीराबरोबर भांडण करत असताना फिर्यादी महिला भांडणे सोडविण्याकरीता गेली असता तिला आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तिच्या अंगावर थुंकून ‘गावात राहायचे असेल तर लायकीत रहा’, अशी धमकी दिली. यावेळी झालेल्या झटापटीत फिर्यादी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे.
या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!