कास रस्त्याला वर्दळ वाढू लागली, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 18 : कोरोनामुळे देश लॉकडाऊनमध्ये असताना पर्यस्थळांकडे जाण्यासही बंदी आहे मात्र गेल्या चार पाच दिवसांमध्ये कास रोडवर पर्यटकांची वर्दळ वाढल्याचे दिसुन येत असुन लॉकडाऊनची ऐशी तैशी होताना दिसत आहे

सध्या कोरोनामुळे सर्वत्र कडक लॉकडाऊन आहे. पर्यटन स्थळे ओस पडू लागली आहेत. मात्र साताऱ्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सातारा शहरातील सर्वच पेट्रोल पंपावर सर्वांना पेट्रोल दिले जात आहे. याचाच गैरफायदा घेत साताऱ्यातील काही हौशी लोक कास रस्त्यावर फिरायला गर्दी करू लागले आहेत. त्यात प्रेमी युगुल देखील कमी नाहीत त्यांची देखील गर्दी या परिसरात दिसू लागली आहे.चार चाकी वाहनांमध्ये दोन ते तीन व्यक्तींना परवानगी असताना सरसकट लोक या परिसरात जात आहेत. साताऱ्यातील काही उद्योगपतींनी या परिसरात जागा घेऊन हॉटेल व बंगले बांधले आहेत ते तर कायम साताऱ्यातुन ये जा करत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. ग्रामीण भागामध्ये कडक लॉकडाऊन चे नियम पाळले जात असून,एका गावातून दुसऱ्या गावात एकाही नातेवाईकांना इकडे तिकडे ये जा करण्यास परवानगी दिली जात नाही.

मात्र साताऱ्यातील लोकांची वर्दळ कास रस्त्यावर वाढल्याने एकीकडे भीती व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेल्या आठ दहा दिवसांमध्ये पेट्रोल डिझेल सर्वांनाच मिळू लागल्याने आणी दारुची दुकानेही सुरू झाल्याने कास रोडवर काही पर्यटकांची व रोडवरील बंगले धारकांची वर्दळ वाढली असुन रात्रीच्या वेळी वाहनांची वर्दळ दिसुन येत आहे तर काही पर्यटक हॉटेल मध्ये चहा नाष्टा मिळेल का याचीही मागणी करत असुन यवतेश्वर घाट व कास रोड वर रात्रीच्या वेळी दारुच्या पाटर्याही झडत असल्याचे स्थानीक प्रवाशांच्या निर्दशनास येत असुन कास रोडवरील पर्यटकांची व हौशेनौशांची वर्दळ थांबवुन लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कारवाई करावी आशी मागाणी पारिसरातील नागरीकांतुन व्यक्त होत आहे

नुकताच चौथा लॉकडाऊन शासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे हे जर का असेच सुरू राहीले तर कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात देखील व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा पोलीस प्रशासनाने यावर वेळीच लक्ष घालून साताऱ्यातील लोंढे जे कास रस्त्यावर मौज मजा करण्यासाठी येत आहेत त्यांच्यावर अंकुश ठेवून कडक कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे

साताराकरांकडून कास रस्त्यावर लॉकडाऊन ची ऐशी की तैशी : सातारा शहरातील लॉकडाऊन हे थोड्या फार प्रमाणात शिथिल केले आहे. त्यात पेट्रोल व दारू मिळायला सुरवात झाल्याने कास रस्त्यावर सातारा शहरातून येणाऱ्या मध्यपी व प्रेमी युगुल यांची संख्या वाढली आहे.तेव्हा पोलीस प्रशासनाने यावर लक्ष घालून संबंधित कासला लॉकडाऊन तोडून फिरायला येणाऱ्या लोकांवर कार्यवाही करावी अशी मागणी सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष व सदस्य कास पठार कार्यकारी समिती यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!