दैनिक स्थैर्य । दि. ०६ मे २०२२ । मुंबई । गॅस सिलिंडर्सच्या देशभरात वाढत चाललेल्या किंमतींपासून ग्राहकांना काहीसा दिलासा मिळावा यासाठी भारताची अग्रगण्य डिजिटल पेमेंट आणि फायनान्शियल सर्व्हिस कंपनी असलेल्या पेटीएम ब्रॅण्डची मालक कंपनी वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने आज एलपीजी सिलिंडर बुकिंग्जवर आणि पेमेंट्सवर दोन आकर्षक कॅशबॅक ऑफर्सची घोषणा केली. या दोन्ही ऑफर्स पेटीएमअॅपवर सुरूही झाल्या आहेत.
यापैकी नवीन यूजर्ससाठी असलेल्या ऑफरद्वारे पहिल्या एलपीजी गॅस बुकिंगवर किंवा आधी केलेल्या बुकिंगसाठी पेटीएमच्या माध्यमातून केलेल्या बुकिंगवर रु. ५०- रु.१,००० पर्यंतचे कॅशबॅक जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी ग्राहकांना केवळ व्यवहार पूर्ण करताना ‘फर्स्टगॅस’ (FIRSTGAS) हा प्रोमो कोड टाकायचा आहे. दुसरी रु. १० ते रु. १००० पर्यंतचे कॅशबॅक मिळविण्यासाठीची ऑफर विद्यमान यूजर्ससाठी आहे. यात त्यांना एलपीजी सिलिंडर बुक करताना किंवा आधीच केलेल्या बुकिंगसाठी पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट करताना ‘गॅस१०००’ (GAS1000) हा प्रोमो कोड टाकायचा आहे.
पेटीएमचे प्रवक्ता म्हणाले, “पेटीएममध्ये आम्ही आमच्या वैविध्यपूर्ण पेमेंट पद्धतींनी आणि युटिलिटी पेमेंट्सपासून ते लोन्सपर्यंत, आरोग्यसेवेपासून ते अशा कितीतरी गोष्टींपर्यंत सर्व प्रकारच्या वित्तीय सेवांच्या साथीने यूजर्सना त्यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी सक्षम बनविण्याप्रती कटिबद्ध आहोत. सध्या देशभरात वाढत चाललेल्या गॅसच्या किंमतींचा भार कमी करण्यास हातभार लावण्याच्या हेतूने आम्ही आमच्या नवीन आणि विद्यमान यूजर्सठी दोन नव्या कॅशबॅक योजना आणल्या आहेत. या नव्या कॅशबॅक ऑफर्स व त्यांना मिळालेली गॅस सिलिंडर्सचे विनासायास बुकिंग व पेमेंट करण्याच्या आमच्या सुविधेची जोड यामुळे आमच्या ग्राहकांना सिलिंडर्स बुक करण्याचा अधिक चांगला अनुभव मिळू शकणार आहे.”
पेटीएम अॅपच्या माध्यमातून आजवर सिलिंडर घरपोच करण्याचे २ कोटींहून अधिक व्यवहार पूर्ण झाले आहेत. देशभरातील यूजर्समध्ये या अॅपची वाढती लोकप्रियताच यातून दिसून येते. हे अॅपपेटीएम वॉलेट, यूपीआय, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि पेटीएम पोस्टपेड (बीएनपीएल) यांसारख्या आपल्या अनेक पेमेंट माध्यमांच्या मदतीने ग्राहकांना गॅस सिलिंडर्सचे झटपट बुकिंग करण्याची तसेच त्यासाठीचे पैसे भरण्याची मुभा देते. त्याचबरोबर पेटीएम सुपर अॅपच्या माध्यमातून यूजर्सना आपल्या आपला सिलिंडर डिलिव्हरीच्या कोणत्या टप्प्यावर आहे यावरही सहज नजर ठेवता येते.
गॅस सिलिंडर्स बुकिंगबरोबरच पेटीएम यूजर्सना देशभरातील २५ पुरवठादारांकडून दिल्या जाणा-या पाइप्ड गॅस कनेक्शनचे पेमेंट करण्याची सुविधाही देते. याखेरीज मोबाइल चार्जिंग, डीटीएच रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी, अपार्टमेंट, पाणी, केबल टीव्ही आणि अशी कितीतरी बिले भरण्याची ताकद पेटीएम आपल्या यूजर्सना देते.