स्थैर्य, फलटण दि. 19 : फलटण शहरातील श्रीराम बझारच्या महात्मा फुले शाखेचे शटर उचकटून 1 लाख 32 हजार रुपयांची रोकड आज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातुन मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दि. 17 जूनच्या दुपारी साडेचार ते शुक्रवार दि. 18 जूनच्या सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान श्रीराम बझारच्या महात्मा फुले चौक शाखेचे गोडाऊनचे शटर उचकटून आज्ञात चोरट्यानी आतमधील तिजोरीतील नोटा व चिल्लर अशी एकुण 1 लाख 32 हजार 266 रुपयांची रोकड चोरुन नेली. सदर चोरीस गेलेलेल्या रकमेपैकी 50 हजार रुपये घटनास्थळी मिळून आले आहेत.