दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२१ । लोणंद । लोणंद गावच्या हद्दीतील एचआर कॉम्पी ट्रॉनिक्स या दुकानातुन मोबाईल व रोकड चोरणारा लोणंद पोलिसांनी गजाआड केला.
याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की लोणंद, ता. खंडाळा गावच्या हदीत हर्षद भुजबळ यांच्या एच आर कॉम्पीट्रॉनिक्स या दुकानातुन दि. २५ रोजी ग्राहक म्हनुन आलेल्या दोन पुरुष इसमांनी दुकानातुन सुट्टे पैसे हवे आहेत असे सांगून कपाटात विक्रीसाठी नवीन मोबाईल व कॅश काऊंटरमधील रोख रक्कम असा एकुण २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हातचलाखीने चोरून नेला होता.
सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे यांनी सुचना दिल्या होत्या. लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकासह घटनास्थळी भेट देऊन तेथे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोणंद शहरात लावलेल्या ठिकठिकाणी सीसीटीव्हीची तपासणी करून गुन्हे प्रकटीकरणास सुचना दिल्या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी पुणे येथील कात्रज व हडपसर या भागातील राहणारे असल्याचे निष्पन्न करून देविदास किसन पवार वय ३९ रा अंजनीनगर कात्रज पुणे यास अटक केले आहे सदर गुन्ह्याची त्याने कबुली दिली असून त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता खंडाळा पोलिस ठाण्याचे हद्दीतील बँकेमध्ये चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे.
या कारवाईत लोणंद पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, सहा फौजदार पाडवी, संतोष नाळे, श्रीनाथ कदम, सागर धेंडे, अभिजित घनवट, केतन लाळगे, अविनाश शिंदे, शिवशंकर तोटेवाड, गोविंद आंधळे,सिध्देश्वर वाघमोडे,विजय शिंदे यांनी सहभाग घेतला होता.