निरगुडीत भांडणातून परस्पर विरोधी गुन्हे दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२४ | फलटण | तालुक्यातील निरगुडी येथे भांडणातून परस्पर विरोधी गुन्हे हे फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आले आहेत. निरगुडी (ता. फलटण) येथील मायलेकीसह त्यांच्या कुटुंबास ‘आमच्याविरोधात पोलिसात तक्रार का दिली’ असे म्हणत शेजारीच राहणार्‍या एका कुटुंबातील चौघाजणांनी लाथाबुक्क्यांसह, काठीने, पाईपने मारहाण केली. तसेच मायलेकीचा विनयभंग केल्याची तक्रार मारहाण झालेल्या पीडित मुलीने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे. यासोबतच त्यांच्या विरोधात ‘घराबाहेर येऊन आईला शिव्या का देतोस’ याचा जाब विचारला म्हणून लाथा, बुक्क्याने मारहाण केली म्हणून पीडित महिलेने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तिघांवर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!