दैनिक स्थैर्य । 30 नोव्हेंबर 2024 । फलटण । वाठार निंबाळकर, ता.फलटण गावच्या हद्दीत वाठार फाटा या ठिकाणी बेकायदेशीरपणे दोन जर्शी गायींची व एका कालवडीची वाहतूक करत असल्याप्रकरणी दोघांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.28/11/2024 रोजी सायंकाळी 5:40 वाजणेच्या सुमारास वाठार निंबाळकर (ता.फलटण) गावच्या हद्दीत वाठार फाटा या ठिकाणी रोहित संजय निकाळजे (वय 21), रा.गिरवी, ता.फलटण हा इस्लाम हजी शेख, रा. अलगुडेवाडी, ता.फलटण याचे सांगणेवरुन त्याच्या मालकीची दोन जर्शी गायीची व एक कालवड स्वत:चे कब्जात असताना चार चाकी टेंपो क्रमांक एम.एच.11 ए. जी. 8319 यामध्ये दाटीवाटीने भरुन त्यांचे चारा पाण्याची कोणतीही सोय न करताना व वैद्यकीय तपासणी न करता जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना कत्तलीसाठी घेऊन जात असताना आढळून आल्याने रोहित निकाळजे व इस्लाम हजी शेख या दोघांवर प्राण्यांचा छळ अधिनियम 1960, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976, मोटर वाहन अधिनियम 1988 अन्वये फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पुढील तपास हवालदार अडसुळ हे करीत आहेत.