
दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑकटोबर २०२२ । सातारा । आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फेब्रुवारी 2019 ते ऑगस्ट 2022 पर्यंत राहुल रामचंद्र गोडसे, केतन रामचंद्र गोडसे (दोघेही रा. खिंडवाडी, ता. सातारा), अल्ताफ हुसेन इलाही पटेल रा. यादोगोपाळ पेठ, सातारा, अतुल शांताराम सुतार राहणार दुसाळे, ता. पाटण, आकाश रामचंद्र पवार राहणार कोयनानगर ता. पाटण यांनी गणेश लक्ष्मण कुंभार रा. रासाटी, ता. पाटण यांना जमीन विकत घेऊन, विकसित करून व्यवसाय करायचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी बँक खात्यावर 16 लाख तीस हजार रुपये घेतले व जमिनीचा व्यवहार न करता कुंभार यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून सपोनि सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.