दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । फलटण । गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी आपल्या आवडत्या गणपती बाप्पांचे झालेले आगमन त्यामुळे आपण सर्वजण अतिशय उत्साहात आहे. त्यानुसार बाप्पांच्या बरोबर यावर्षी पावसाचेही आगमन झाले. फलटणमध्ये पावसाने सुद्धा चांगलीच हजेरी लावलेली आहे. या काळामध्ये आपण आपल्या आवडत्या बाप्पांचे विसर्जन करणार आहोत. विसर्जन मिरवणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने व प्रशासनाने दिलेल्या नियमांच्या आधीन राहुनच विसर्जन मिरवणुक शांततेत पार पाडावी, असे आवाहन आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले आहे.
गणपती विसर्जन करताना तरूणाईने शांततेच्या व सौदार्याच्या भावनेतूनच हा सण साजरा करावा. प्रशासनाच्या माध्यमातून तरुण मंडळींच्या उत्साहाला जरूर तिथे नियंत्रण ठेवण्यात यावे. बाकी गोष्टींमध्ये प्रशासनाने तरुणांना सहकार्य करावे. यासोबतच तरुणांनी पारंपरिक पद्धतीने थाटामाटांमध्ये गणपती विसर्जन करावे, असे ही यावेळी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.